सुरगाणा महाविद्यालयात कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांची जयंती संपन्न

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

सुरगाणा: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सुरगाणा येथे 1 मार्च रोजी महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समिती नाशिक या शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षण व सहकार महर्षी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांची 117 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी.जी. दिघावकर यांच्या हस्ते कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी.जी. दिघावकर म्हणाले की, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत तसेच 1942 च्या स्वतंत्र आंदोलनात त्यांचे कार्य अतुलनीय होते. महाराष्ट्रात सहकाराची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली.

1937 मध्ये त्यांना लोकप्रतिनिधित्व करण्याची प्रथम संधी मिळाली. भाऊसाहेबांनी कूळ कायदा करून गरीब शेतकऱ्यांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करून दिले  भाऊसाहेबांनी सहकार, शिक्षण, राजकारण ,कायदा आणि समाजकारण या क्षेत्रात असामान्य असं कर्तृत्व केलेले आहे .त्यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्थापनेमध्ये महत्त्वाचे योगदान दिले. भाऊसाहेब हिरे यांनी महाराष्ट्र शासनात अनेक मंत्रिपदे भूषविली.

आदिवासी, दुर्लक्षित, दुर्गम व ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी सन 1945 मध्ये आदिवासी सेवा समिती तर सन 1952 मध्ये महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेची स्थापना केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस. आर. पावडे यांनी केले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.व्ही.डी.अहिरे, शैक्षणिक समन्वयक प्रा. एस. एम. भोये, महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.