धक्कादायक.. सुकी नदीपात्रात २२ मृत बैल आढळले

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव जिल्ह्यात लंपी आजाराने थैमान घातले. यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सुकी नदी पात्रात आज सकाळी २२ मृत बैल आढळून आले आल्याने खळबळ उडाली आहे.

सुकी नदीच्या पुलावरून नदीच्या पात्रात २२ बैल मृत अवस्थेत दिसून आले आहेत.  पुलावरील एखाद्या वाहनातून या बैलांना खाली पात्रात फेकून दिले असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. हे मृत बैल नदी पात्रात कसे आले ? त्यांना कोणी फेकले आहे का ? अशा अनेक प्रश्नांची अद्याप माहिती मिळू शकली नाहीय.

तसेच या मार्गावरून गुरांची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असते. यातील काही बैलांच्या गळ्याला दोराचा देखील आढळून आला. एखाद्या वाहनात ही गुरे कोंबल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाला असेल त्यानंतर त्यांना या सुकी नदीपात्रात टाकले असेल. असे मृत बैलांची स्थिती पाहता सांगितले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.