आमदार विनायक मेटे यांच्या पुतण्याने केली आत्महत्या

0

बीड, लोकशाही न्यूज नेटवर्क

शिवसंग्राम पक्षाचे नेते आणि दिवंगत आमदार विनायक मेटे यांच्या पुतण्याने आत्महत्या केली आहे. सचिन मेटे असे त्यांच्या पुतण्याचे नाव असून, बीडच्या राजेगाव परिसरात त्यांनी गळफास घेत आपले आयुष्य संपवले आहे. या आत्महत्येमागील कारण समोर आले नसून, पोलीस अधिक तपस करत आहे.

दिवंगत लोकनेते विनायकराव मेट यांच्या 34 वर्षीय पुतण्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सचिन मेटे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. बीडच्या (Beed) राजेगाव परिसरात त्याने गळफास घेतला आहे.

सचिन मेटे हे विनायक मेटे यांचे बंधू त्र्यंबक मेटे यांचे सुपुत्र आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. या दुर्देवी घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस याबाबत सविस्तर तपास करत आहे.

गेल्यावर्षीच शिवसंग्राम संघटनेचे विनायक मेटे यांचा अपघाती मृत्यू झाला होता. १४ ऑगस्ट २०२२ रोजी विनायक मेटे यांच्या गाडीचा मुंबई- पुणे एक्सप्रेसवर भीषण अपघात झाला होता. यामध्ये विनायक मेटे यांचे दुर्देवी निधन झाले. वर्षभरात घडलेल्या आणखी एका घटनेने मेटे कुटुंबावर दुखःचा डोंगर कोसळला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.