धूम स्टाईलने सोनसाखळी लंबविण्याचा घटना वाढल्या !

0

वृद्ध महिलेची मंगलपोत लांबविली ; महिलांमध्ये घबराट

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

रस्त्याने पायी चालणाऱ्या महिलांना हेरून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी लांबवून धूम स्टाईलने लांबविण्याच्या घटना अलीकडे पुन्हा वाढल्या असून या घटनांमुळे महिला वर्गात घबराट पसरली आहे. अशीच एक ताजी घटना समोर आली आहे. शतपावली करणाऱ्या वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील ६३ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत जबरी हिसकावून अज्ञात व्यक्तींनी पोबारा केल्याचा प्रकार सदोबा नगरात घडला आहे याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालिनी चंद्रकांत पाटील (वय-६४), रा. सदोबानगर, जुना नशिराबाद रोड जळगाव या म. १९ मार्च रोजी रात्री १० वाजता त्या नेहमीप्रमाणे शतपावली करण्यासाठी बाहेर गेल्या होत्या. जुना नशिराबाद रोडकडून पायदळ जात असताना अज्ञात दोन जण दुचाकीवर येऊन त्यांच्या गळ्यातील ६३ हजार रुपये किमतीची २१ ग्राम वजनाचे सोन्याची पोत बळजबरी हिसकावून पसार झाले. त्यांनी आरडाओरड केली, तोपर्यंत दोन्ही भामटे दुचाकीवरून पसार झाले होते. या घटनेबाबत त्यांनी सोमवारी २० मार्च रोजी रात्री उशिरा तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.