रेल्वेत धूम्रपान केल्यास खिसा होईल रिकामा, प्रवाशांना ठोठावला दंड

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

रेल्वेगाड्यांमध्ये धूम्रपान करणे व ज्वलनशील पदार्थ नेणाऱ्यांवर दक्षिण-पूर्व-मध्ये रेल्वेने बडगा उगारला आहे. कारवाईत ९२ प्रकरणे उघडकीस आली आहे. अशा प्रवाशांवर कडक कारवाई करून दंड ठोठावण्यात आला.

रेल्वेतून ज्वलनशील व स्फोटके पदार्थ नेण्यावर बंदी आहे. तरीही सुरक्षा धाब्यावर बसवून प्रवाशांकडून याचे उल्लंघन होत आहे. या घटनांना आळा घालवण्यासाठी दक्षिण-पूर्व-मध्ये रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे ३० ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबरदरम्यान विशेष सुरक्षा मोहीम राबविण्यात येत आहे. यात विविध गाड्यांची तपासणी करून सीसीटीव्हीद्वारे नागपूर विभागातर्फे ३० ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबरदरम्यान विशेष सुरक्षा मोहीम राबविण्यात येत आहे. यात विविध गाड्यांची तपासणी करून सीसीटीव्हीद्वारे प्रवाशांच्या सामानावर लक्ष ठेवले जात आहे.

या मोहिमेत १ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान रेल्वेत धूम्रपान करणाऱ्या ९२ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १८ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला.रेल्वेत प्रवाशांनी ज्वलनशील पदार्थ नेऊ नये, असे आवाहन दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेने केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.