शिंपी समाजाच्या प्रलंबित मागण्या लवकरच पूर्ण करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क

अखिल भारतीय क्षत्रिय नामदेव महासंघ नवी दिल्ली शाखा महाराष्ट्राच्या वतीने नुकतेच प्रदेशाध्यक्ष महेश ढवळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात प्रत्यक्ष भेट घेऊन शिंपी समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

या निवेदनात राज्य शासनाकडे शिंपी समाजाच्या प्रलंबित असलेल्या मागण्या संदर्भात चर्चा करून विनंती केली होती. ढवळे यांच्या प्रयत्नांना यश प्राप्त झाल्याचे राज्य संघटक मनोज भांडारकर यांनी आज प्रसिद्धीपत्रका द्वारे कळविले असून आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदरील पत्रावर गंभीरपणे विचार करून पुढील कार्यवाही साठी पत्रावर रिमार्क करून पाठवल्याचे पत्र आज प्राप्त झाले.

अखिल भारतीय क्षत्रिय नामदेव महासंघ व समस्त शिंपी समाज बांधवांच्या मागण्या लवकरच पूर्ण होतील हे या पत्रावरून निश्चित झाले आहे. त्यामुळे प्रदेश अध्यक्ष महेश ढवळे यांच्या प्रयत्नांना लवकरच यशप्राप्त होणार आहे हे निश्चित आहे. अशी माहिती मनोज भांडारकर राज्य संघटक अखिल भारतीय क्षत्रिय नामदेव महासंघ महाराष्ट्र यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.