वाहतूक बदलामुळे शेंदुर्णीत प्रचंड वाहनांच्या रांगा

0

शेंदुर्णी, लोकशाही न्युज नेटवर्क 

जळगाव संभाजीनगर महामार्गावरील वाकोद गावाच्या पुढे असलेल्या पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे या मार्गावरील वाहतुक अन्य ठिकाणी वळविण्यात आली असुन अधिक जवळचा मार्ग म्हणुन पहुर शेंदुर्णी सोयगाव व फर्दापुर मार्गे संभाजीनगर हा मार्ग सध्या एस.टी.बस, लक्झरी व ट्रक अन्य अवजड वाहतुक करणारी वाहने शेंदुर्णी शहरातुन जात आहे.

दरम्यान शेंदुर्णी गावात रेल्वे स्टेशन ते हनुमान मंदिर बस स्थानक परिसरात प्रचंड वाहनांच्या रांगा लागत असुन पहुर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप व शेंदुर्णी दुरक्षेत्र चे पोउनि.दिलीप पाटील यांच्या योग्य नियोजनामुळे रेल्वे स्टेशन भागात वाहन थांबवुन एक एक वाहन सोडण्यात येत आहे. यामुळे अधिक वाहतुकीची कोंडी निर्माण होत नाही. यामुळेच या मार्गावरील वाहतुक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

लांब पल्ल्याच्या गाडीस तात्पुरता थांबा मिळावा 

शेंदुर्णी येथुन सध्या मार्ग बदलल्याने असंख्य लांब पल्ल्याच्या विविध बस आगारातील बसेस शेंदुर्णी मार्गे जात आहे. मात्र या बसेस शेंदुर्णीत थांबत नाही. त्यांच्या जवळ शेंदुर्णीचे तिकीट नसल्याने प्रवाशांना शेंदुर्णी येथे उतरवले जाते नाही. येथुन त्या बसेस मध्ये प्रवाशांना घेतलं सुद्धा जात नाही. यामुळे असंख्य बसेस दररोज जात आहे मात्र शेंदुर्णी मध्ये जळगाव विभागाने तरी सध्याच्या काळापुरती तिकीट उपलब्ध करून देऊन प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी प्रवाशांकडून नागरिकांच्या तसेच विद्यार्थी वर्गाकडुनही होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.