एकटी पाहून हेरलं; मग एकटीनेच… (व्हिडीओ)

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क;

महिलांचं भांडण हे नेहमीच चर्चेचा विषय असतो. मग काय त्यात भाषा… काय केस ओढाओढी… अन काय ते इतरांना हश्या… सगळं… असो, पण महिला अगदी क्षुल्लक कारणावरूनही भांडतात आणि झालेली त्यांची भांडणं बर्‍याचदा हाणामारीपर्यंत पोहोचतात. असाच महिलांच्या फाईटचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतो आहे.

3 महिलांची जबरदस्त फाईट झाली. एका रेस्टॉरंटमध्येच या तिघी भिडल्या. काही कारणामुळे सुरुवातीला त्यांची बाचाबाची झाली. दोन महिला एका महिलेला अगदी तावातावाने बोलल्या. ती महिलाही तसं त्याला उत्तर देत होती. पण सुरुवातीला तिने शांतपणे घेतलं. नंतर तिच्या रागाचा पारा इतका चढला की ती आउट ऑफ कंट्रोल झाली आणि तिने एकटीने दोन्ही महिलांची धुलाई केली.

महिला त्या दोघींना इतक्या भयंकर पद्धततीने मारते की पाहून आपल्यालाही धक्का बसतो. जणू ती प्रोफेशनल फाईटर आहे. शेवटी रेस्टॉरंट मधील काही लोक आणि कर्मचारी तिला अडवतात आणि तिथून बाहेर नेतात. नाहीतर या महिलेने त्या महिलांचं काय केलं असतं सांगू शकत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.