SBI च्या ग्राहकांसाठी खुशखबर, सेवा मिळतील WhatsApp वर

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

तुम्ही देखील स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कारण आता तुम्हाला तासन् तास रांगेत उभे राहायची गरज नाही. ग्राहकाच्या अडचणी दूर करण्यासाठी बँकेने नवीन सुविधा सुरू केलीय. स्टेट बँक ऑफ इंडिया आता WhatsApp वर अनेक बँकिंग सेवा देत आहे. ग्राहक त्यांच्या मोबाइल फोनचा वापर करून QR कोड स्कॅन करून WhatsApp द्वारे SBI बँक सेवा घेऊ शकतात. बँक खात्यातील जमा रक्कम, मिनी स्टेटमेंट, पेन्शन स्लिप, कर्जाची माहिती अशा तब्बल १३ बँकिंग सेवा SBI WhatsApp वरून देत आहे. पाहूया कोणत्या सेवा WhatsApp वर मिळणार..

 

बँकेच्या सुट्ट्या : SBI WhatsApp बँकिंग सेवेचा वापर करून तुम्हाला बँकेच्या सुट्ट्या समजणार आहेत. जेणेकरून बँकेत तुमची फेरी वाया जाणार नाही.

मिनी स्टेटमेंट: एसबीआय आपल्या ग्राहकांना व्हॉट्सअ‍ॅप बँकिंगद्वारे मिनी स्टेटमेंट पाहण्याची सुविधा देखील देत आहे. यात लिंक केलेल्या खात्यातील शेवटच्या दोन व्यवहार तपशील दिला जाईल.

पेन्शन स्लिप सेवा: जे सेवानिवृत्त झालेले कर्मचारी आहेत त्यांची पेन्शन चालू आहे. ते ग्राहक एसबीआय व्हॉट्सअॅप बँकिग सेवेद्वारे पेन्शन स्लिप जनरेट म्हणजेच तयार करू शकतात.

बँकिंग कामांच्या स्लिप: एसबीआय व्हॉट्सअ‍ॅप बँकिंग सेवेचा वापर करून ग्राहक सामान्य बँकिंग स्लिप्स मिळवू शकतील. उदा. डिपॉझिट फॉर्म, पैसे काढण्याची स्लिप.

बँकेतील ठेवीचा तपशील: SBI WhatsApp बँकिंग ग्राहकांना बचत खाते, आवर्ती ठेव Recurring Deposit (RD), मुदत ठेव (FD), आणि टर्म ठेवसह इतर ठेवीचा तपशील आपण यातून जाणून घेऊ शकतो.  SBI ग्राहक त्यांच्या खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी WhatsApp सेवा वापरू शकतात. ही सेवा बचत आणि चालू खातेधारक दोन्हीसाठी उपलब्ध आहे.

कर्जाचे तपशील: SBI ग्राहक व्हॉट्सअ‍ॅप बँकिंगद्वारे गृह कर्ज, कार कर्ज, सुवर्ण कर्ज (गोल्ड लोन), वैयक्तिक कर्ज, शैक्षणिक कर्ज इत्यादी सेवांचा तपशील तपासू शकतो.

नवीन बँक खाते उघडता येणार: WhatsApp बँकिंग सेवेद्वारे १८ वर्षांपेक्षा जास्त वय असलेले ग्राहक नवीन SBI Insta खाते उघडू शकतात. हे नवीन खाते उघडण्याशी पात्रता आणि कागदपत्रांची काय आवश्यकता असेल याची सर्व माहिती व्हॉट्सअ‍ॅपवरून मिळेल. परदेशात राहणारे लोक NRE खाते, NRO खाते तपशील सुद्धा SBI WhatsApp बँकिंग द्वारे घेऊ शकतील.

डेबिट कार्डची माहिती: बँक खातेधारकरांकडे डेबिट कार्ड असेल ते ग्राहक आपल्या डेबिट कार्डची माहिती घेऊ शकतात. डेबिट कार्डचा किती वापर झालाय, त्यावरून करण्यात आलेले व्यवहारांची माहितीदेखील या व्हॉट्सअपवरून घेऊ शकतात.

कार्ड हरवले किंवा चोरीला गेले तर: ग्राहक एसबीआय व्हॉट्सअ‍ॅप बँकिंग सेवेद्वारे हरवलेले आणि चोरी झालेले कार्डची सेवा देखील मिळवू शकतात.

जवळचं एटीएम दाखवेल: नियमित बँकिंग सेवांव्यतिरिक्त, SBI WhatsApp बँकिंग ग्राहकांना त्यांच्या जवळील SBI ATM किंवा शाखा शोधण्यात मदत करेल.

संपर्क/तक्रार निवारण हेल्पलाइन: व्हॉट्सअ‍ॅप बँकिंगच्या सेवेतून ग्राहक त्यांच्या एसबीआय खात्याशी संबंधित अधिकृत संपर्क तपशील, तक्रारी नोंदवू शकतात.

पूर्व-मंजूर कर्जाच्या समस्या: SBI आपल्या ग्राहकांना पूर्व-मंजूर कर्जे देखील ऑफर करते. (वैयक्तिक, कार आणि दुचाकी कर्ज). ग्राहक व्हॉट्सअ‍ॅपवरून त्यांच्या पूर्व-मंजूर कर्जांचे तपशील तपासू शकतात.

 

अशी मिळवा SBI WhatsApp सेवा 

एसबीआय व्हॉट्सअप बँकिंग सेवा मिळवण्यासाठी नोंदणी करणं आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून खालील “WAREG खाते क्रमांक” या स्वरूपात +917208933148 वर एसएमएस पाठवा.

जर तुमचा खाते क्रमांक 123456789 असेल, तर मी WAREG 123456789 म्हणून +917208933148 वर एसएमएस पाठवा. जर नोंदणी यशस्वी झाली तर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरशी लिंक केलेल्या तुमच्या Whatsapp वर एक संदेश येईल. त्यानंतर +919022690226 नंबर तुमच्या फोनमध्ये सेव्ह करा आणि नंतर WhatsApp उघडा आणि त्या नंबरवर “Hi” पाठवा. त्यानंतर, चॅट बॉटद्वारे देण्यात आलेल्या ऑन-स्क्रीन सूचनांचे पालन करा.

 

Leave A Reply

Your email address will not be published.