स्वकष्टातून शेती केली समृद्ध!

धानोरा सरपंच तडवी यांचा प्रयोग' राज्य शासनाचा पुरस्कार

0

धानोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क

धानोरा, (ता. चोपडा) येथे बेमोसमी पाऊस, दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष्य यावर कायमस्वरुपी तोडगा काढत स्वकष्टातून शेतीला समृद्ध करण्यासाठी पुढाकार घेत रान हिरवे करण्यावर येथील सरपंच रज्जाक अमीर तडवी यांनी काम केले आणि त्यांच्या कष्टाचे चीज झाले. राज्य सरकारच्या वतीने त्यांच्या कार्याची दखल घेत सन 2022 चा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार तडवी यांना घोषीत करण्यात आला आहे.

धानोरा येथील सरपंच रज्जाक अमीर तडवी हे शेतीला आपली आई माणून तिची सेवा करीत असतात. नवतत्रंज्ञानाची जोड देत त्यांनी शेतीला समृद्ध करण्यावर भर दिला. ते आणि घरातील सदस्य दिसव-रात्र शेतीत राबत असतात, त्यातूनच त्यांनी शेतीत वेगवेगळे प्रयोग करुन उत्कृष्ट शेती केली आहे. याचीच दखल राज्य सरकारने घेवून त्यांना पुरस्कार जाहीर केला आहे. तडवी हे राजकरण, समाजकारणातही कमालीचे सक्रिय आहेत. अडल्यानडल्या माणसाला मदत करणे हा त्यांचा स्वभाव असून ‘रज्जाक मेंबर’ या नावाने ते परिसरात परिचित आहेत. त्यांच्या या यशाबद्दल परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.

सरपंच रज्जाक तडवी
‘‘शेती समृद्ध झाली तर अन्न धान्याची वाढीव गरज पूर्ण होण्यास हातभार लागणार आहे. विविध प्रयोगाच्या माध्यमातून शेतीचे सोने केले. काळ्या आईची सेवा हेच आपले कर्तव्य आहे. पुरस्कार दिल्याबद्दल राज्य सरकारचा आभारी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.