Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार
    • उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात नागपंचमीनिमित्त प्रचंड गर्दी
    • शुल्लक कारणावरून अपहरण करत बेदम मारहाण
    • मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक
    • बापरे! शाळकरी मुले थोडक्यात बचावली!
    • नाशिक जिल्ह्यात पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के
    • माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी
    • अखेर नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव आरटीओ कार्यालयात दुचाकी पसंती क्रमांकांसाठी नोंदणी
    जळगाव

    जळगाव आरटीओ कार्यालयात दुचाकी पसंती क्रमांकांसाठी नोंदणी

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 3, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
    उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात परिवहनेतर संवर्गातील दुचाकी वाहनांची नवीन नोंदणी एमएच-19/ ईडी-0001 ते 9999 पर्यंतची मालिका लवकरच सुरु करण्यात येणार असून ज्या वाहन धारकांना आपल्या नविन वाहनांकरीता आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करावयाचा असल्यास त्यांनी परिवहन कार्यालयात दिनांक 8 व 9 मार्च, 2023 रोजी दुपारी 4.00 वाजेपर्यंत अर्ज जमा करावे.

    असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहेत.

    पसंती क्रमांकाच्या अर्जासोबत अर्जदाराने क्रमांकानुसार विहीत केलेल्या शासकीय शुल्काचा राष्ट्रीयकृत बँकेचा डीडी (डी.डी. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांचे नावे) तसेच वाहन ज्यांच्या नावाने नोंदणी करावयाचे आहे. त्यांचा पत्ता पुरावा व आधारकार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक सादर करणे बंधनकारक आहे. आकर्षक क्रमांकाची पावती प्राप्त झाल्यावर पावती ही वितरकाकडे वाहन नोंदणी करणेकामी देणे बंधनकारक असेल. पावतीची विधीग्राह्यता ही फक्त 30 दिवसांची असेल.

    दिनांक 8 व 9 मार्च 2023 रोजी दुपारी 4.00 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील व दि. 10 मार्च 2023 रोजी अर्जाची छानणी करण्यात येईल. एकाच क्रमांकासाठी अनेक अर्ज प्राप्त झाल्यास दि. 10 मार्च 2023 दुपारी 2.00 वाजेपर्यंत वाढीव शुल्काचा धनाकर्ष डी.डी. स्वतंत्र बंद लिफाफ्यातून सादर करणे बंधनकारक राहील. दि. 10 मार्च 2023 रोजी दुपारी 2.00 वाजता बंद लिफाफे सहा/ उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे समक्ष उघडण्यात येतील व जास्त रकमेचे धनादेश सादर केलेल्या अर्जदारास सदर क्रमांक बहाल करण्यात येईल व उर्वरित अर्जदारास त्यांचे धनादेश परत करण्यात येतील. असे श्याम लोही, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी कळविले आहे.

    Rto Jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार

    August 17, 2026

    शुल्लक कारणावरून अपहरण करत बेदम मारहाण

    August 17, 2026

    मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक

    August 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif