रोझलँण्ड इंग्लिश मीडियम स्कूल येथे विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

0

जळगाव ;- रोझलँण्ड इंग्लिश मीडियम हायस्कूल रिंग रोड दिनांक 15 रोजी शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत केले. शाळेतच्या विश्वास पहिल्यांदाच पाऊल टाकणाऱ्या चिमुकल्यांनी नव्याकोऱ्या गणवेशाची नवलाई अनुभवली , शाळेत मुलांना चॉकलेट्स व फुगे देऊन स्वागत केले. नव्यानेच शाळेत घातलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे पालक शाळेच्या पहिल्या दिवसात आवर्जून उपस्थित होते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी वर्ग खोल्या तसेच शाळेचे संपूर्ण आवार सजविले होते, ते बघून विद्यार्थी व पालक भाराऊन गेले. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.