‘ग.स’.च्या कर्जावरील व्याजदरात कपात ; वचनांची पुर्तता-अध्यक्ष उदय पाटील

0

जळगाव | प्रतिनिधी
सहकार गटाने निवडणूक पुर्वी दिलेल्या वचनांची पुर्तता करून ग. स. सभासदांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे.
१) जामिन कर्ज व अपंग सभासद कर्ज व्यादर १०% वरून ९% ( 9% कपात ) वर्गणीचे आतिल कर्ज व्याजदर ८% वरून ७.५% ( 1½ % कपात ) विशेष कर्ज व्याजदर १०% वरून १०.५०% करणे ३) ४) परिषद अॅडव्हान्स कर्ज व्याज दर १३% वरून ११.५०% (१.५० % कपात ) विशेष कर्ज मर्यादेत रू.७५ हजार ते रू. १ लाख वाढ एकुण कर्ज मर्यादा रू.१५ लाख सर्व प्रकारच्या ठेवीवरील व्याजदरात 1½ % वाढ (9 जेष्ठ, अपंग व महिलांसाठी सभासदांच्या ठेवीवर प्रचलीत व्याजदरापेक्षा 1½% जादा व्याजदर दरमहा ६ .७५% आकर्षक व्याज देणारी ‘सभासद अभिनव ठेव योजना सुरू
तसेच येत्या वार्षिक साधारण सभेची मान्यता घेवुन सहकार खात्याच्या पोटनियम दुरूस्तीव्दारे उर्वरीत खालील वचनांची पुर्तता करण्यात येईल.
१)जनता अपघात विमा संरक्षण मर्यादा रु.३ लाखावरून रू.१० लाख वाढ करणे .
२) मयत सभासदाला १००% कर्ज माफी देणे.
३) मयत तसेच लवादी सभासदांच्या वारसांना दिलासा देणेसाठी one time setelment (O.T.S.) योजनेव्दारे संस्थेची थकीत कर्ज वसुली करणे. ४)D.C.P.S. धारकांसाठी विशेष योजना राबविणे. अध्यक्ष उदय पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना सांगितले
यावेळी पाध्यक्ष रविंद्र सोनवणे, गटनेते अजवसिंग पाटील, संचालक ज्ञानेश्वर सोनवणे,भाईदास पाटील, महेश पाटील, रागिणी चव्हाण, अजय देशमुख, विश्वास पाटील, योगेश इंगळे, मंगेश भोईटे, तज्ञ संचालिका जयश्री महाजन, तज्ञ संचालक राम पवार तसेच सहकार गटाचे उपाध्यक्ष एस. एस. पाटील, कोषाध्यक्ष व्ही. झेड. पाटील, व्यवस्थापक वाल्मीक पाटील इत्यादी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.