राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा

0

पारोळा , लोकशाही न्यूज नेटवर्क

येथील राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयात आज नाटककार ,कथाकार व कवी वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा करण्यात आला.

सदर कार्यक्रम प्रसंगी प्रतिमा पूजन प्राचार्य डॉ.डी.आर.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.सदर प्रसंगी डॉ.आर.बी.नेरकर ,प्रा.जे.बी.पाटील,प्रा.बी.एन. पाटील,संदीप मोरे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ.संभाजी सावंत यांनी केले.

आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.डी.आर.पाटील यांनी मराठी भाषेचे महत्त्व व संवर्धन तसेच वि.वा.शिरवाडकर यांच्या कार्याची माहिती दिली.यानंतर विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातील विविध पुस्तकांचे अवलोकन केले.प्रा.एस.डी.पाटील यांनी आभार मानले .

Leave A Reply

Your email address will not be published.