गोंदिया, लोकशाही न्यूज नेटवर्क
शेत जमिनीच्या नोंदणीत फेरफार करण्याच्या कामासाठी पैशांची मागणी केली. तलाठ्याला तीन हजार रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. गोंदिया जिल्ह्यातील नैनपूर येथे ही घटना घडली आहे. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात त्यात असलेल्या नैनपूर येथे ही घटना घडली. या प्रकरणात तक्रारदाराकडून आरोपीने शेतजमिनीच्या बक्षीसपत्राची नोंदणी प्रत व फेरफार करून देण्यासाठी लाच माहीतली होती. सुरेन मुन्ना मरगाये असे लाचखोर तलाठ्याने नाव आहे.
तलाठ्याने लाच मागितल्याने याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार सापळा रचून तलाठ्याला तीन हजार रुपयाची लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आहे. गुन्हा नोंदणीचे काम सुरु होते.