समाजसेविंकडून वृक्षारोपण आणि शैक्षणिक साहित्य वाटप…

0

 

वडनगरी, लोकशाही न्यूज नेटवर्क;

“समाजसेवा हिच ईश्वर सेवा” हे ईश तत्व अंगिकारून श्री. सत्य साई सेवा समितीच्या समन्वयिका सौ. आकांक्षा कुलकर्णी, जिल्हा न्यायालयातील सहा. अधीक्षक श्री.मंगलसिंग राजपूत, श्री. बी. जी.नाईक, ॲड.नितीन जोशी आणि एम. आय. डी. सी. पोलीस स्टेशनचे पो. हे. कॉन्स्टेबल श्रीराम बोरसे यांच्या आर्थिक योगदानातून जळगांव तालुक्यातील वडनगरी येथे जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता १ ते ४ थी च्या सर्व विद्यार्थ्यांना दप्तर, पाटी, वह्या, कंपास कीट, वॉटर बॅग, लंच बॉक्स इत्यादी साहित्याचे आणि अंगणवाडीतील सर्व बालकांना बिस्किटाचे रविवार दि. १७/७/२०२२ रोजी समाज सेवेच्या स्वरूपात वाटप करण्यात आले. तसेच यावेळी शाळेच्या परिसरात वृक्षारोपण देखील करण्यात आले.

सदर कार्यक्रमास मुख्यध्यापिका शीतल चौधरी मॅडम, शिक्षण समिति व्यवस्थापिका सौ.दिपाली सोनवणे,  सरपंच उमाकांत पाटील आणि अंगणवाडी सेविका यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रियांका कुमावत मॅडम यांनी तर मनोगत बी.जी.नाईक यांनी केले तर गट शिक्षण अधिकारी श्री. पठाण यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमासाठी पालकांची आणि गावकऱ्यांची देखील उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.