डॉ. दीपक पाटील यांचे “व्यक्तिमत्व विकास” विषयावर व्याख्यान

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

माध्यमिक विद्यालय शारदा कॉलनी जळगाव येथे रोटरी क्लब 7x7x7 प्रोजेक्ट अंतर्गत दि. 14.09.2022 रोजी डॉ. दीपक पाटील यांचे “व्यक्तिमत्व विकास” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

यावेळी रोटरीयन डॉ. दीपक पाटील व रोटरी समन्वयक संदीप शर्मा व विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष व्ही.एम. गिरणारे उपस्थित होते. डॉ. दीपक पाटील व संदीप शर्मा यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही.एम गिरनारे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर विद्यालयाचे मुख्याध्यापक व्हि.एम गिरणारे यांचे स्वागत इंटरॅक्ट क्लबची विद्यार्थिनी उपाध्यक्षा उर्मिला पवार हिने केले.

यादरम्यान डॉ. दीपक पाटील यांनी विद्यार्थ्यांना विविध गोष्टी सांगत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी जीवन जगत असताना व्यक्तिमत्व विकास कसा साधावा यावर सखोल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता 9 वी तील रोहिणी अलाट तर उर्मिला पवार या विद्यार्थिनीने आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मा.मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.