पिकविमा नुकसान भरपाई द्यावी ; निवेदन

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
पारोळा- पारोळा तालुक्यात अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाल्याने,भरपाई मिळावी म्हणुन तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिकविमा काढला होता. या पीकविम्याची सरसकट रक्कम शासनाने द्यावी म्हणुन महाराष्ट्र शेतकरी संघटनेने कृषी विभागाला निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
तालुक्यातील मौजै महाळपुर येथील शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान झाल्याचे विमा कंपनीला कळविले असतांना काही शेतकऱ्यांचा पंचनामा करण्यात आला होता तर काहींचे अजूनही पंचनामे झालेले नाही तसेच काही शेतकऱ्यांचा खात्यावर तुटपुंजी रक्कम आली तर काही यापासून अजुनही वंचित आहेत.यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे शासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष तथा शेतकरी नेते सुनील देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाळपुर शाखेच्या माध्यमातून तालुका कृषी अधिकारी भरत वारे व पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी रामोशी यांना देण्यात आले. निवेदन देतवेळी शाखाध्यक्ष गुलाब पाटील,कार्याध्यक्ष विशाल पाटील,उपाध्यक्ष रवींद्र पाटील, खजिनदार शांताराम पाटील, सचिव वासुदेव पाटील,आरोग्य प्रमुख देवेंद्र पाटील,प्रसार माध्यम प्रमुख रामकृष्ण पाटील, महासचिव कुंदन पाटील,सदस्य मनोहर पाटील,श्याम पाटील, रघुनाथ पाटील,प्रभाकर पाटील, अकबर शब्बीर अरब उपस्थीत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.