ट्रक्टरच्या धडकेत तरुण ठार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
वरणगाव – भुसावळ तालुक्यातील सावतर निभोरा येथील तरुण कठोरा बु ॥ येथुन पायी घरी जात असताना प्राथमिक आरोग्य केंद्रा जवळ ट्रकरने जोरदार धडक दिल्याने उपचारा दरम्यान ठार झाल्याची घटना रविवार दि ८ रोजीच्या सकळच्या सुमारास घडली
मयत इक्बाल शहा अब्दूल शहा फकिर ( २६ ) हा कठोरा येथून पायी चालत घराकडे सवतर निभोरा येथे जात असताना माघून भरधाव वेगाने येणारे ट्रकर क्र एम एच २८ ए झेड ४९२६ यावरील चालकाचा ताबा सुटल्याने तरुणास जोरदार धडक दिल्याने त्यांच्या छाती , पोटा वरून ट्रक्टरचे चाक गेल्याने गंभीर जखमी अवस्थेत त्याला नागरिकाच्या मदतीने वरणगाव खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरानी त्याची तपासणी करून मृत घोषित केले।
याबाबत वरणगाव पोलीस स्टेशनला लतीफ शहा मुसाशहा फकीर यांच्या फिर्यादी नुसार अपघाताचा गुन्हा भा द वी कलम ३०४ , ३३७ , २७९ , मो आ का १८४ प्रमाणे दाखल करण्यात आला असून ट्रक्टर चालक बाळकृष्ण गिरधर चौधरी यास ताब्यात घेतले। घटनेचा पुढील तपास सह उप पो निरिक्षक परशुराम दळवी करीत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.