झटपट बनवा पास्ता विथ टोमॅटो सॉस

0

खाद्यसंस्कृती विशेष 

घरच्या घरी अगदी झटपट हॉटेलसारखा यम्मी पास्ता विथ टोमॅटो सॉस कसा बनवायचा ते पाहुयात..

साहित्य:

टोमॅटो सॉस बनवण्यासाठी

* ६ टोमॅटो मध्यम आकाराचे (लालबुंद, पिकलेले असे वापरावेत.)

* १ मोठा कांदा, बारीक चिरून

* १० पाकळ्या लसुण, बारीक चिरून

* १ टीस्पून मिक्स हर्ब्स

* १ टीस्पून काळी मिरी पूड किंव्हा कुटून

* १ टीस्पून चिली फ्लेक्स

* १/२ टीस्पून लाल मिरची पूड

* २ टीस्पून टोमॅटो केचप

* ३ टेबलस्पून ऑलिव ओईल किंव्हा बटर

* मीठ चवीनुसार

* १ कप पाणी

 

पास्ता बनवण्यासाठी

* १ पाकीट पास्ता (२५० ग्रॅम )

* टोमॅटो सॉस- वर कृती दिली आहे

* १/४ कप गाजर, छोटे चौकोनी तुकडे करून

* १/२ कप ब्रोक्कोली

* १/२ कप सिमला मिरची

* १/४ कप बेबी कॉर्न्स, छोटे तुकडे करून -(किंवा स्वीट कॉर्नचे दाणे, उकळलेले – १/४ कप)

* ऑलिव ओईल किंव्हा बटर जरुरीप्रमाणे

* १/४ कप चीज,किसलेले

* मीठ चवीनुसार

 

कृती:

टोमॅटो सॉस बनवण्यासाठी

* पाणी उकळत ठेवा. उकळी आली की त्यात टोमॅटो टाकून २-३ मिनिटे शिजवून घ्या. सालाला तडे गेले की समजावे टोमॅटो शिजले.

* थंड झाल्यावर साले काढून टोमॅटोचे तुकडे करा आणि मिक्सरमध्ये वाटून त्याची प्युरी बनवा.

* प्यानमध्ये तेल गरम करून कांदा आणि लसूण गुलाबी रंगावर परतून घ्या.

* त्यात मिरची पूड आणि मीठ घालून जरासे परता.

* त्यात टोमॅटो प्युरी, मिक्स हर्ब्स, चिली फ्लेक्स, काळी मिरी पूड, टोमॅटो केचप व पाणी टाका. (शक्यतो टोमॅटो शिजवण्यासाठी वापरलेलेच पाणी वापरा. ) छान एकत्र करून उकळी येऊ द्या. मध्ये मध्ये ढवळत रहा.

* हा सॉस तुम्हाला लगेच वापरायचा नसेल तर थंड करून फ्रिझरमध्ये ठेवा. महिनाभर चांगला राहील.

 

पास्ता बनवण्यासाठी

* पास्ताच्या पाकीटावर दिलेल्या सूचनेप्रमाणे पास्ता शिजवून घ्या. (पाणी उकळत ठेवा, त्यात मीठ घाला. उकळी आली की पास्ता टाकून ८-१० मिनिटे शिजवा. जास्त शिजऊ नये, मऊ पडतो. शिजला की चाळणीमध्ये ओतून निथळत ठेवा. वरून थंड पाणी ओता.)

* थोड्याश्या तेलावर मीठ आणि मिरी पूड घालून सर्व भाज्या एक एक करून २-३ मिनिटे परतून घ्याव्यात.

* वर सांगितलेला टोमॅटो सॉस उकळत ठेवावा, त्यात परतलेल्या भाज्या, उकडलेला पास्ता, किसलेले चीज घालून व्यवथित एकत्र करून घ्या.

* वरून किसलेले चीज घालून गरमागरम वाढा आणि गरमागरम खा.

 

अपर्णा स्वप्निल कांबळे-नांगरे

पत्रकार/फुड ब्लॉगर, मुंबई

मो. ९८९२१३८१३२

Leave A Reply

Your email address will not be published.