पारोळा येथे वाळूचे आठ ट्रॅक्टर जप्त

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क

पारोळा पोलीस प्रशासन आणि पारोळा महसूल विभागाकडून तालुक्यातील बहादरपुर विचखेडे, हिवरखेडे बु येथील गावा जवळील बोरी नदीच्या पात्रात
दि.२ रोजीच्या मध्यरात्री २ वाजता अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ८ ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली.

दि. २ च्या पहाटे बहादरपुर विचखेडा हिवरखेडे बु. गावाजवळील बोरी नदीच्या पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वर अमळनेर उपविभागीय अधिकारी राकेश जाधव, पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष भंडारे, तहसीलदार अनिल गवांदे, यांच्या संयुक्त पथकाने सयूंक्तपणे कारवाई करित अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू तस्करांवर कारवाई करत ८ ट्रॅक्टर जमा करून पंचनामा करण्यात आला. पारोळा पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले.

या कारवाईत पारोळा शहर तलाठी निशिकांत माने, बहादरपुर तलाठी प्रवीण शिंदे, महेंद्र पाटील, कैलास माळी, पोलीस कर्मचारी नाना पवार, दिपक आहिरे यांचा समावेश होता. एकाच रात्रीत ८ वाळू ट्रॅक्टर जप्तीची कारवाई तालुक्यात प्रथमच झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.