पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क
पारोळा येथील अमळनेर रोडवरील महेश मेगा मार्ट येथे दि २५ जुलै च्या मध्यरात्री २० डबे चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी की मेगा मार्ट समोर बोलेरो गाडी क्र, एम एच,१९ बी एम ३९२१ यात धुळ्याहुन परिवार कंपनी चे १५ किलो वजनाचे ११० सोयाबिन तेल डबे घेऊन चालक दिनेश चव्हाण रा, जोगलखेडे यांनी गाडी मेगा मार्ट समोर रात्री उभी करून गेले, असता सकाळी जेव्हा गाडी खाली करण्यात आली तर त्यात ९० डबेच मिळुन आले. महेश मेगामार्ट चे संचालक आशिष हिंदुजा यांनी पारोळा पोलीसात तक्रार दिली असून, पुढील तपास पारोळा पोलिस करीत आहेत.