मुस्लिम समाजातील आदर्श विवाह; मुलगी बघायला आले आणि लग्न लावून गेले

0

पिंपळगाव हरेश्वर ता. पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क

येथील एमआर फ्रुट कंपनीचे हाजी गुलामगोस (बापू) बागवान यांची नात तथा सादिक गुलामगोस बागवान यांची मुलगी बघायला जरंडी ता. सोयगाव येथील अमिर खाजा बागवान यांचा मुलगा जमीर उर्फ भैय्या आज दि २६ जानेवारी रोजी पिंपळगावला आले असता त्यांनी प्रजासत्ताक दिनी शुभमुहूर्तावर लग्न लावून गेले. मुस्लिम समाजातील हा पहिला आदर्श विवाह असून सर्वच समाजात असे विवाह व्हावे अस मत शालिग्राम मालकर यांनी वधूवरांना शुभेच्छा देतांना व्यक्त केल.

विवाहप्रसंगी आशीर्वाद देतांना फोटोमध्ये डावीकडून समीर बागवान, शालिग्राम मालकर, वधुपिता सादिक बागवान, नवरदेव भैय्या अमीर बागवान, वरपिता आमिर बागवान, खाजामिया बागवान, आबीद बागवान (सामाजिक कार्यकर्ते) यांचेसह बागवान समाजातील निवडक लोक उपस्थित होते.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर निवडक लोकांमध्ये झालेल्या ह्या विवाहाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत असून बागवान परिवाराने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे अभिनंदन आ. दिलीपभाऊ वाघ यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.