ओझरखेडा येथे बनावट देशी दारू अड्ड्यावर छापा, १ जण ताब्यात

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क

भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा येथे बनावट देशी दारू बनविणाऱ्या खरखान्यावर छापा टाकण्यात आला आहे. यात एका आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोबतच ४६ लाख ३७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबद्दल संपूर्ण माहिती माहिती जळगाव जिल्हाधिकारी राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक डॉ. व्ही. टी. भुकन यांनी दिली आहे.

हा अवैध बनावट मद्यसाठा मिळून आल्याने मोठ्या प्रमाणात आंतरराज्य मद्य तस्करांची टोळी कार्यरत असण्याची शक्यता आहे. यासंदर्भात पुढील तपास सुरु आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सुर्यवंशी, संचालक अं. व दक्षताप्रसाद सुर्वे, जिल्हधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही करण्यात आली आहे.

या कार्यवाहीत जिल्हा राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक डॉ. व्ही. टी. भुकन, भुसावळचे विभागीय निरीक्षक सुजित ओं. कपाटे, निरीक्षक अन्वर खतीब यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.

Leave A Reply

Your email address will not be published.