भयंकर स्कॅम.. इंजिनिअरला 200 कोटींचा चुना

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  

आजकाल कोण कोणत्या पद्धतीने फसवेल सांगता येत नाही. या ऑनलाईनच्या सायबर क्राईम मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. जास्त पैशांचे आमिष दाखवत अनेकांना गंडवले जाते. अशीच एक घटना पुण्यातून समोर आलीय. चक्क उच्च शिक्षित असलेल्या इंजिनिअर तरुणाला मोठा चुना लावला आहे.

पुण्याच्या हिंजवडीतील नामांकित कंपनीत कार्यरत असणाऱ्या अनेक आयटी अभियंत्यांना त्यांच्या मोबाईलवर एक ऑनलाईन टास्क आला. ‘रेटिंग द्या अन् पैसे मिळवा’ हे वाचून, घरबसल्या वरचा खर्च निघेल, या आशेने हे अभियंते या टास्कच्या मोहात पडले अन् त्यांना लाखो रुपयांना गंडा बसला. या भामट्यांच्या जाळ्यात अडकलेला प्रशांत टाले एकटाच नाही, तर या टोळीनं देशभरातील तीन कोटी उच्च शिक्षितांकडून तब्बल 200 कोटी हडपले. ऑनलाईन टास्कद्वारे गंडा घालणारी टोळी तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करते. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी त्यांनी मोठी शक्कल ही लढवली होती. ‘ऑनलाईन टास्क”च्या जाळ्यात अडकवण्यासाठी या भामट्यांनी तीन टप्पे पडले होते.

या पहिल्या टप्प्यात गोरगरिबांच्या नावाने बँकेत खाती खोलायची अन् ती खाती विकत घ्यायची. त्यांनतर दुसऱ्या टप्प्यात या खात्यांवरून टास्क सोडवणाऱ्यांना पैश्यांची देवाण-घेवाण व्हायची आणि त्या खात्यांवरील रक्कम गायब केली जायची. जेव्हा तपासात या धक्कादायक बाबी समोर आल्या तेव्हा पोलीस देखील  चक्रावून गेले.

दरम्यान पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने शिताफीनं तपास करत या टोळीचा पर्दाफाश केला. आतापर्यंत 14 आरोपींना बेड्या ठोकल्यात. तब्बल 95 बनावट बँक खाती ही सील केली. हॉंगकॉंग व्हाया दुबई पर्यंत तपासाची लिंक ही पोहचली आहे. असे एक दोन नव्हे तर देशातील तब्बल 3 कोटी उच्च शिक्षित तरुण अशाच एका ऑनलाइन फ्रॉडच्या जाळ्यात फसलेत अन् या सर्वांना गंडवणाऱ्या एका आंतररष्ट्रीय सायबर गुन्हेगारांचे रॅकेट पिंपरी चिंचवड पोलिसांनी उद्ध्वस्त करत आरोपींनी जेरबंद केलंय.

म्हणून अशा कोणत्याही अमिषाला बळी न पडता कोणत्याही ऑनलाईन गोष्टीत पैसे गुंतवताना किंवा व्यवहार करताना शंभर वेळेस विचार करावा.

Leave A Reply

Your email address will not be published.