काय सांगता ? माणसाच्या त्वचेपासून बनवलेले कपडे ऑनलाईन ?

0

 

व्हायरल, लोकशाही न्यूज नेटवर्क:

आपल्याला कुठलीही गोष्ट हवी असल्यावर आपण लगेच एका क्लिकवर ती म्गावतो. मग त्यात टी कुठलीही गोष्ट असो, मात्र आतातर हद्दच झाली आहे. आजवर कपडे खरेदीसाठी ऑनलाईन पर्याय निवडला असेल तर अनेक अतरंगी फॅशनचे कपडे उपलब्ध आहेत. अशात ऑनलाईन पद्धतीने माणसाच्या त्वचेपासून तयार केलेलं एक जॅकेट मिळत आहे. हे जॅकेट सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरंल होतंय. माणसाच्या त्वचेपासून तयार करण्यात आलेलं हे जॅकेट पाहून सर्वत्र राग आणि संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावर ऑनलाईन पद्धतीने अशा जॅकेटची विक्री करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याचं काम सुरू आहे.

न्यूयॉर्क पोस्टच्या एका रिपोर्टनुसार, हे जॅकेट ऑनलाईन पद्धतिनेच उपलब्ध आहे. ऑर्डर केल्यावर तीन आठवड्यांनी तुम्हाला तुमचे जॅकेट मिळते. सोशल मीडियावर तुम्हाला या जॅकेटसाठी ऑर्डर द्यावी लागते. यावेळी तुम्हाला छान वाटत असलेला कोणताही ड्रेस किंवा जॅकेट तुमच्याकडून घेतला जातो. तीन आठवडे यावर काम केल्यानंतर माणसाच्या त्वचेप्रमाणे हे जॅकेट दिसते.

माणसाच्या त्वचेची कपडे विकत असलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिले आहे की, माणसाच्या त्वचेपासून बनवण्यात आलेलं जॅकेट खरोखर माणसाची त्वचा वापरून बनवलेलं नाही. यात वापरण्यात आलेल्या पदार्थांची माहिती आणि जॅकेट तयार होण्याची माहिती यात देण्यात आली आहे. मात्र हे बनवणाऱ्या व्यक्तीने जॅकेट इतकं बारीक काम करून बणवलं आहे की, खरोखर वस्तू आणि कपड्यांवर माणसाची त्वचा लावल्यासारखं वाटत आहे. यामध्ये फक्त त्वचाच नाही तर डोळे, ओठ अशा गोष्टी देखील काढण्यात आल्या आहेत. माणसाच्या त्वचेसारखं अगदी हुबेहूब बनवण्याची त्या व्यक्तीची कला आहे. मात्र अशा प्रकारे फक्त जॅकेट आणि कपडे नाही तर चप्पल, टोपी अशा वस्तूंना देखील माणसाच्या त्वचेपासून बणवण्यात आलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.