आदिवासी दिनानिमित्ताने 358 व सावित्री रमाई युवती ग्रुप तर्फे कार्यक्रम…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

काल दि. ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त 358 ग्रुप व सावित्री रमाई युवती ग्रुप तर्फे पिंप्राळा हुडको येथे आयोजित सामाजिक कार्यक्रमात ‘जयभीम’ चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले.

यावेळी, छत्रपती शिवाजी महाराज, बिरसा मुंडा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रमाई आंबेडकर, सावित्रीमाई फुले, महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर, गायत्री ठाकूर या युवतीने सावित्री रमाई युवती ग्रुप च्या स्थापने मागची हेतू व उद्दिष्टे उपस्थितांना सांगितले. त्याचा बरोबर आदिवासी हक्क व न्याय याचेही महत्व लोकानां यावेळी तिने पटवून दिले. त्यानंतर परिसरातील जनतेला आदिवासी न्याय व हक्काच्या विषयावर आधारित “जयभीम” चित्रपट दाखवण्यात आला.

याप्रसंगी, किशोर मोरे, भुरा सोनवणे, बापू सोनवणे अनिल गायकवाड, 358 ग्रुप चे संस्थापक अजय गरुड, अध्यक्ष पंकज सोनवणे, उपाध्यक्ष गणेश पगारे, सचिव सुनिल शिरसाठ, सहसचिव नितीन अहिरे, सावित्री रमाई युवती ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा गायत्री ठाकूर, श्रुती खैरनार, मायुरा ठाकूर, प्रज्ञा सपकाळे, विशाल बाविस्कर, सुमित सोनवणे, राजू निकम, रोहन साळुंखे, रोहन अवचारे, सारंग सोनावणे, आकाश नरवाडे, ललित पारधी, निलेश सुरवाडे, बबलू सोनवणे, विशाल खेरनार, आनंद सोनवणे, आणि इतर कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिकही उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.