व्वा … ! पाण्यात वाहून आलेल्या नोटा गोळा करण्यासाठी एकच झुंबड !

0

पाटणा , लोकशाही न्यूज नेटवर्क

आपण रस्त्याने चालत असताना एखादी नोट आपल्याला दिसली तर लगेच आपण कुणी आपल्याकडे बघत नाही या अविर्भावात ती नोट त्वरित आपल्या खिशात टाकून मार्गस्थ होतो . मात्र जर पाण्यात नोटांचा लाट वाहून आल्यावर आपली काय अवस्था होणार याची कल्पनाच न केलेली बरी . अशीच एक घटना बिहारच्या सासाराम शहरात शनिवारी घडली. मुफस्सिल पोलीस ठाण्याच्या मुरादाबादजवळील कालव्यातून मोठ्या प्रमाणात नोटा (रोख) मिळाल्याची माहिती मिळाली. शनिवारी अचानक नागरिकांना कळल्यानंतर मुरादाबादच्या कालव्यात मोठ्या प्रमाणात नोटा टाकण्यात आल्या आहेत , मग काय? याची माहिती मिळताच नोटा लुटण्यासाठी तुफान गर्दी झाली होती. ज्यांना पाण्यात उतरण्यासाठी भीती वाटते अशानीही नोटा गोळा करण्यासाठी उद्या घेतल्या. नोटांचे बंडले घेऊन लोक पळू लागले . अशी आश्चर्यकारक घटनेने पूर्ण राज्य आचमबीत झाले आहे. नोटा आल्या कुठून याचा पोलीस शोध घेत आहे.

यातील बहुतेक नोटा 10 आणि 100 च्या असल्याचे सांगितले जात आहे. नोटा लुटण्याचा व्हिडिओ व्हायरल होऊ लागल्यावर ते बघून तिथे मोठी गर्दी झाली. माहिती मिळताच मुफस्सिल फसिल पोलीस ठाण्याचे पोलीसही घटनास्थळी पोहोचले. नोटांचे बेंडाळे पाहून लोकांचा आनंद गगनात मावेनासा झाल्याचे उपस्थितांनी सांगितले.

पहाटे नोटांचे बंडल पाण्यात तरंगताना दिसल्यानंतर आजूबाजूचे लोक पाण्यात उतरले आणि नोटांचे बंडल उचलण्यास सुरुवात केली, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. ही रोकड कुठून आली किंवा कोणत्या प्रकारची नोट आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ही नोट खरी आहे की खोटी? हेदेखील अद्याप समजू शकले नाही हे सर्व तपासानंतरच कळू शकेल, मात्र सध्या या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.