Nokia C30 स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या.. किंमत आणि वैशिष्ट्ये

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

नोकियाने आज एकसाथ तीन नवीन फोन लॉन्च केले आहेत. यात रगेड फोन XR20, फिचर फोन Nokia 6310 आणि लो बजेट स्मार्टफोन Nokia C30 चा समावेश आहे. हे तिन्ही फोन जागतिक बाजारात वेगवेगळ्या फीचर्स आणि वेगवेगळ्या किंमतीत लाँच केले गेले आहेत. या लेखात आपण 6,000mAh बॅटरीसह लाँच करण्यात आलेल्या Nokia C30 च्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची वैशिष्ट्य पाहुयात..

 

 

Nokia C30 हा स्मार्टफोन कंपनीने सध्या युरोपमध्ये लाँच केला आहे, हा फोन येत्या काही दिवसांत जगभरात लाँच केला जाऊ शकतो.

युरोपियन मार्केटमध्ये Nokia C30 स्मार्टफोन 2GB + 32GB, 3GB + 32GB आणि 3GB + 64GB अश्या तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. या सर्व मॉडेल्सची किंमत कंपनीने सांगितली नाही परंतु नोकिया सी30 सीरीजची किंमत €99 म्हणजे 8,500 रुपयांच्या आसपास सुरु होईल, असे सांगण्यात आले आहे.

 

 

नोकिया सी30 स्मार्टफोन कंपनीने 6.82-इंचाच्या एचडी+ एलसीडी डिस्प्लेसह सादर केला आहे. हा ‘वी’ नॉच असलेला डिस्प्ले 20:9 अस्पेक्ट रेशियो आणि 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. Nokia C30 स्मार्टफोन 1.6गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह Unisoc SC9863A आणि Android 11 (Go edition) वर चालतो.

या स्मार्टफोनमध्ये कंपनीने 3GB पर्यंत रॅम आणि 64GB पर्यंतची स्टोरेज दिली आहे. ही स्टोरेज मेमरी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येईल. Nokia C30 मधील ड्युअल रियर कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळतो. तसेच हा फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या नोकिया स्मार्टफोनमध्ये 6,000 एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.