बापरे ! टोलनाक्यावर दोन महिलांची फ्रीस्टाईल हाणामारी (व्हिडीओ)

0

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सध्या सोशल मीडियावर काय व्हायरल होईल सांगता येत नाही. नाशिकच्या टोलनाक्यावरील दोन महिलांच्या तुफान हाणामारीच्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हिडीओ तुफान व्हायरल

नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर टोल भरण्यावरून दोन महिलांमध्ये हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. टोलनाक्यावर बऱ्याचदा छोटे मोठे वाद होत असतात. मात्र या महिलांच्या हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

टोलनाक्यावरील महिला कर्मचारी आणि सीआरपीएफ जवानाची पत्नी यांच्यात टोल भरण्यावरून हाणामारी झाली. पिंपळगाव पोलिसांनी मध्यस्थी केली. नंतर वादावर मिटला.

नेमकं प्रकरण काय ?

निफाड तालुक्यातील सीआरपीएफ जवान पत्नी आणि दोन मुलांसोबत पुणे येथे जात होता. कार पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर आली. सरकारी कार्ड दाखवून जवानाने खासगी कार सोडण्याची विनंती केली. टोलनाक्यावरील महिला कर्मचाऱ्यांनी टोल भरावा लागेल, कार्ड चालणार नाही, असे सांगितले. वेळेत पोहचता यावे म्हणून वाद न घालता सीआरपीएफ जवानाने टोल भरला. कार पुढे निघणार तोच सीआरपीएफ जवानाची पत्नी टोल नाक्यावरील महिला टोल कर्मचारी यांच्यात वाद सुरू झाला. थोड्याच वेळात वाद वाढला आणि दोघींमध्ये हाणामारी झाली. अखेर प्रकरण पोलीस ठाण्यात गेले. पोलिसांनी दोन्ही बाजू ऐकून मध्यस्थी करत वाद मिटवला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.