नासाने दिली इस्रोला एक मोठी ऑफर !

0

नवी दिल्ली ;– भारताच्या अंतराळ स्थानकाच्या बांधकामात सहकार्य करण्यास तयार असल्याचे नासा या संस्थेतर्फे सांगण्यात आले असून इस्रोला अमेरिकन अंतराळ संस्था नासाने मोठी ऑफर दिली आहे.

अमेरिकन अंतराळ संस्था नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांनी मंगळवारी ही माहिती दिली. नेल्सन म्हणाले की, अमेरिका आणि भारत पुढील वर्षाच्या अखेरीस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) भारतीय अंतराळवीर पाठवण्याच्या नियोजनावर काम करत आहेत. नेल्सन म्हणाले की, नासाकडून अंतराळवीरांची निवड केली जाणार नाही. त्यांची निवड इस्रोकडूनच केली जाईल. भारत दौऱ्यावर असलेल्या नेल्सन यांनी मंगळवारी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये अंतराळ संदर्भातील विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली.

यावेळी दोघांमध्ये विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. संवादादरम्यान नासाचे प्रशासक नेल्सन यांनी जितेंद्र सिंग यांना या कार्यक्रमाला गती देण्याचे आवाहन केले. एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, अमेरिका भारताच्या अंतराळ स्थानकाच्या बांधकामात सहकार्य करण्यास पूर्णपणे तयार आहे. नेल्सन यांनी त्यांच्या संपूर्ण शिष्टमंडळासह जितेंद्र सिंग यांच्याशी चर्चा केली.

2035 पर्यंत भारतीय अंतराळ स्थानक बांधण्याचे लक्ष्य
नेल्सन म्हणाले की, आम्हाला आशा आहे की भारतातही व्यावसायिक अंतराळ स्थानक असेल. माझ्या मते भारताला 2040 पर्यंत व्यावसायिक अंतराळ स्थानक हवे आहे. भारताने आम्ही सहकार्य करावे असे, वाटत असेल, तर आम्ही नक्कीच सहकार्य करू. पण ते भारतावर अवलंबून आहे. पीएम मोदींनी इस्रोला 2035 पर्यंत भारतीय अंतराळ स्थानक तयार करण्यास आणि 2040 पर्यंत अंतराळवीरांना चंद्रावर उतरवण्याचे उद्दिष्ट दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.