नरेंद्र मोदींचा 8 जून रोजी शपथविधी ?

0

नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क 

सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून राजकीय बैठकांचा धडाका सुरू आहे. त्यातच आताची सर्वात मोठी माहिती मिळाली आहे.

एनडीए लवकरच सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. अशाच नरेंद्र मोदींचा तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून 8 जून रोजी संध्याकाळी 7 वाजता शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर येत आहे.

राष्ट्रपती भवनात हा शपथविधी पार पडेल. तर आंध्रप्रदेश विधासभेसाठी 9 जून तर ओडीसा विधानसभेसाठी 10 जूनला शपथग्रहण सोहळा पार पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत एनडीएला 292 जागा मिळाल्या आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.