कौतुकास्पद : सहा वर्षाच्या नंदिनीचा स्तुत्य उपक्रम

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगावच्या रस्त्यांवर अनेक जीवघेणे खड्डे आहेत. यामुळे अनेक अपघात घडले आहेत आणि रोज घडतही आहेत. ह्याकडे लक्ष देणे ही जरी प्रशासनाची बाब असली तरी बरेच सुज्ञ नागरिक आपापल्या परीने काही ना काही उपक्रम करत असतात. मात्र यासाठी एका लहान मुलीने प्रयत्न केला तर ही फार कौतुकाची बाब म्हटली जाईल.

रोटरी क्लब जळगाव ईस्टचे प्रेसिडेंट रोटे. संग्रामसिंह सुर्यवंशी यांची कन्या नंदिनी संग्रामसिंह सुर्यवंशी हीने तिच्या घरच्यांबरोबर त्या रस्त्याने जात असताना इथे कोणता बोर्ड नाही किंवा काही खून नाही, मार्किंग नाही  जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्यांना इथे खड्डा आहे हे कळेल व तो स्पॉट नेहमीच अपघात होणारा स्पॉट आहे ही चर्चा गाडीत होत असताना तिने अचानक तिच्या वडिलांना प्रश्न केला की आपण स्वतः का इथे बोर्ड लावत नाही.  मी तुम्हाला बोर्ड बनवण्यात  मदत करेल, हे ऐकून संग्राम सूर्यवंशी यांनी लगेचच आपले सहकारी बोलवून नंदनीच्या मदतीने व संकल्पनेने तिथे एक बोर्ड उभारला रविवार १० जुलै रोजी स्वत: वडिलांच्या मदतीने नो एंट्रीचे फलक बनवले आणि अपघातजन्य खड्ड्याजवळ बसवले.

६ वर्षांच्या नंदिनीने या लहान वयात रस्ता सुरक्षेचा एक स्तुत्य उपक्रम पूर्ण केला आहे. जळगाव येथील हॉटेल क्रेझी होम जवळ असलेल्या खड्ड्याकडे समजदारीने पाहत तिने केलेली कामगिरी ही प्रशासनालाही लाजवेल अशीच आहे. तिच्या या समजदारीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.