संतोष बारसे व सुनील राखुंडे यांच्या हत्याप्रकरणी १० ते १२ जणांवर गुन्हा

0

पाण्याच्या टँकरच्या वादातून झाली हत्या ; भुसावळात तणावपूर्ण शांतता

 

भुसावळ ;- माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे या दोघांचा रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार करीत कार अडवून हत्या केल्याची घटना मारीमाता मंदिराजवळ घडली होती . या घटनेमुळे भुसावळ शहरच नव्हे तर जिल्हा हादरला गेला होता . मात्र हि हत्या मागील आठवड्यात झालेल्या पाण्याच्या टँकरच्या वादातून घडल्याचे पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात१० ते १२ जणांविरुद्ध गुणही दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, संतोष मोहन बारसे (वय ४८) आणि सुनील राखुंडे (वय ४५) या दोघांचा बुधवार दि. २९ मे रोजी जुना सातारा भागात मरीमाता मंदिरासमोर अज्ञात हल्लेखोरांनी कारमध्ये बसलेले असताना बेछुट गोळीबार करून त्यांची निर्घूण हत्या केली होती. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तपास सुरू ठेवला आहे. संतोष बारसे यांचे लहान भाऊ मिथुन मोहन बारसे (वय ४१, रा. मोहन पहिलवान नगर, भुसावळ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, मागील आठवड्यात पाण्याच्या टँकरवरून संतोष बारसे आणि संशयित आरोपी यांचे भांडण झाले होते.

या भांडणाच्या रागातून संशयित आरोपी राजू सूर्यवंशी आणि बंटी पथरोड यांच्या सांगण्यावरून हल्लेखोर आरोपींनी गोळीबार करून संतोष बारसे यांच्यासह सुनील राखुंडे याला जीवे ठार मारले आहे. याप्रकरणी शिव पथरोड, विनोद चावरीया, विष्णू पथरोड, सोनू पंडित, राजू सूर्यवंशी, बंटी पथरोड, करन पथरोड, नितीन पथरोड आणि आणखी दोन ते तीन अशा दहा ते अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी राजकुमार शिंदे यांच्यासह अधिकाऱ्यांनी भेट दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.