नुकसान भरपाईच्या वादातून तरुणाची हत्या

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

प्रवास करत असतांना गाडी घासली गेली आणि त्याची नुकसान भरपाईची मागणी केली. भरपाई मागण्यासाठी गेलेल्या तरुणाचा धारदार शस्राने वार करत खून केल्याची घटना शेवाळेवाडी येथे घडली. ही घटना शेवाळेवाडी येथे घडली. सादर घटना रात्री सव्वादहाच्या सुमारास घडली आहे.

शेवाळीवाडी येथील अभिषेक संजय भोसले (वय ३०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. अभिषेक हा फर्निचरचे काम करतो. दरम्यान तो १२ डिसेंबरला सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास कारने शेवाळेवाडी येथील महादेव मंदिराजवळून जात असतांना, त्यावेळी त्याच्या मोटारीला विलास सुरेश सकट (वय ३१ वर्षे, रा.चंदनवाडी, फुरसुंगी) यांची गाडी घासली गेली. त्यावरून अभिषेक व विलास यांचा वादविवाद झाला होता.

दरम्यान रात्री सव्वादहा वाजेच्या सुमारास शेवाळेवाडी-फुरसुंगी रस्त्यावर नुकसान भरपाईबाबत चर्चा करण्यासाठी दोघे भेटले. त्यावेळी झालेल्या वादातून सकट यांच्यासह ७-८ जणांनी अभिषेकच्या तोंडावर व डोक्यावर धारदार शस्त्राने मारहाण करून खून केला. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दोन संशयिताना पोलीसांनी ताब्यात घेतले असून बाकी आरोपीचा शोध सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.