अट्रावलच्या मुंजोबा यात्रोत्सवास सोमवारपासून होणार सुरुवात

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

जिल्ह्यातीलच नव्हे तर खान्देश आणि राज्यभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या अट्रावल येथील, मुंजोबाच्या यात्रेस सोमवार पासून प्रारंभ होत आहे देवस्थानतर्फे यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून यात्रा स्थळी व्यावसायिकांनी दुकाने थाटण्यास सुरुवात केली आहे

फैजपुर उपविभागीय पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे , यावल पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, यावल एस.टीआगाराचे व्यवस्थापक प्रमुख दिलीप महाजन, यावल आगाराचे वाहतूक अधीक्षक प्रमुख जितेंद्र जंजाळ यांनी शुक्रवारी रात्री यात्रा स्थळाची पाहणी करून विश्वस्तांना सूचना केल्या आहेत.

कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षानंतर यंदा या वर्षी प्रथमच श्री मुंजोबा महाराज यांची यात्रा भरत असल्याने यात्रेत मोठी गर्दी होण्याचा अंदाज लक्षात ठेऊन देवस्थान समितीने चोख व्यवस्था केली आहे. तालुक्यातील अट्रावल येथील प्रसिद्ध मुंजोबा मंदिर म्हणजे नवसाला पावणारा अशी भाविकांची श्रद्धा आहे. लगतच्या बऱ्हाणपूर जिल्ह्यासह जिल्ह्यातील भाविक यात्रेत हजेरी लावतात. माघ महिन्यातील सोमवार व शनिवार सह पोर्णिमेला ही यात्रा भरते. यावर्षी यात्रेचे पौर्णिमेसह पाच वार पडत आहेत .

असे येणार यात्रेचे वार
२३ जानेवारी(सोमवार), २८जानेवारी (शनिवार), ३०जानेवारी (सोमवार) ,४फेब्रुवारी (शनिवार), ५फेब्रुवारी (पोर्णिमा) मान देण्याची प्रथा गेल्या यात्रेत मुंजोबाला इच्छित मागणे मागितल्यानंतर त्याची कार्यसिद्धी होताच त्या कुटुंबाकडून मुंजोबाला यात्रेत मान देण्याची प्रथा आहे ,

यात रोडगे, वरण ,भात व वांग्याच्या भाजीचे जेवण दिले जाते यात्रेत असे मान देणाऱ्या कुटुंबीयांची संख्या शेकडोने असल्याने यात्रा स्थळी जिकडे-तीकडे जेवणावळीच्या पंक्ती दिसून येतात. राज्य परिवहन महामंडळाकडून यावल, भुसावळ, फैजपूर, रावेर येथून एसटी बसेस सोडल्या जातात येथील पोलीस ठाण्याकडून यात्रास्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त असतो यासह देवस्थानचे स्वयंसेवक बंदोबस्तासाठी तैनात केले जातात. व्यावसायिक दुकाने यात्रेत पूजा पत्री खेळणी उपहारगृहे आकाश पाळणे संसार उपयोगी वस्तू यासह विविध वस्तूंचे दुकाने लावलेले असतात.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.