धावत्या रेल्वेच्या धडकेत तरूणाचा मृत्यू

0

जळगाव;– जळगाव शहराजवळ जवळ असलेल्या रेल्वे रूळावर एका अनोळखी अंदाजे २५ वर्षीय तरूणाचा धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी २८ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नेांद करण्यात आली आहे.

शनीपेठ पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जळगव रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे खंबा क्रमांक ४२१ च्या २० आणि २२ च्या दरम्यान रविवारी २८ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास एका अनोळखी अंदाजे २५ वर्षीय तरूणाचा मृतदेह आढळन आला. धावत्या रेल्वे खाली आल्याने तरूणाचा मृत्यू झाला असावा असा अंदाज केला जात आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मयत झालेल्या तरूणाची ओळख पटविण्याचे आवाहन शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीखक रंगनाथ धारबळे यांनी केले आहे. पुढील तपास पोहेकॉ शशिकांत पाटील हे करीत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.