जळगाव लोकशाही न्यूज नेटवर्क
शहरातील महाबळ परिसरातील छत्रपती संभाजी नाट्यगृहाजवळील रस्त्यावर चोरट्याने एका जणाचा जबरदस्ती मोबाईल हिसकावल्याची घटना गुरुवार १३ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
इंद्रनिल सोसायटी येथे नितीन रमेश सोनवणे हे वास्तव्यास आहेत. ते गुरुवारी दुपारी छत्रपती संभाजी नाट्यगृहाजवळील संभाजी नाट्यगृह परिसरात बाजारात आले होते. यादरम्यान त्याचा मोबाईल एक लहान मुलगा व एका अनोळखी व्यक्तीने जबरीने हिसकावून नेला. हा प्रकार ध्यानात आल्यानंतर नितीन सोनवणे यांनी तक्रार दिल्यावरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरिक्षक गोपाल देशमुख तपास करीत आहेत.