सरकारचा मोठा निर्णय, इन्फेक्शन, शुगर, कोलेस्ट्रॉलसह १०० औषधे होणार स्वस्त

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

देशात वैद्यकीय उपचार घेणे खूप महाग होत चालेले आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. NPPA म्हणजेच नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी ने ६९ नवीन फॉर्म्युलेशनची किरकोळ किंमत निश्चित केली आहे. यानंतर कोलेस्ट्रॉल, शुगर, ताप, संसर्ग, अतिरक्तस्राव, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, लहान मुलांची अँटिबायोटिक्स यासह 100 औषधे स्वस्त होतील आणि लोकांचा आरोग्यसेवेवरचा खर्च कमी होईल.

सरकारी अधिसूचनेनुसार नवीन पॅकिंगवर सुधारित दर असेल, त्याच वेळी, डीलर नेट्वयॉर्कला देखील किमतीची माहिती द्यावी लागेल. देशात कोरोना महामारीनंतर औषधांच्या किमती आणि वैद्यकीय खर्चात दुप्पट पेक्षा अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे सरकारने फेब्रुवारीच्या सुरुवातीला औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला होता. अशा परिस्थितीत महिनाभरात दुसऱ्यांदा औषधांच्या किंमतीत कपात केल्याने सर्वसामान्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळाला आहे.

‘या’ आदेशाची अंबलबजावणी कशी होणार?
नवीन पॅकिंगवर सुधारित दर लिहिता जाईल. डीलर नेटवर्क किमतींबद्दल माहिती देतील. कंपन्यांनी त्यासाठी पैसे भरले असतील तरच ते निश्चित किमतीवर जीएसटी वसूल करू शकतील.

NPPAचे काम काय आहे?
NPPA ची स्थापना १९९७ मध्ये झाली. ही संस्था फार्मा उत्पादनांच्या किंमती ठरवते. औषधांच्या किंमतींवर नियंत्रण ठेवते आणि औषधांच्या किंमतींवर लक्ष ठेवते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.