महात्मा फुले यांचा अपमान करणाऱ्या मनोहर भिडे वर कडक कारवाई करावी

महाराष्ट्र माळी महासंघ व सामजिक पदाधिकाऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

मनोहर भिडे (Manohar Bhide) यांनी मागील काही दिवसापूर्वी क्रांतीसुर्य ‘महात्मा ज्योतिबा फुले’ आणि ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ यांच्या बाबत अवमानकारक वक्तव्य केले होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल देखील अपमान कारक वक्तव केले होते. महापुरुषांचा अपमान करून समाजातील जनतेच्या भावना दुखवण्याचे वाईट कृत्य करणाऱ्या या वाचाळवीर मनोहर कुलकर्णी उर्फ मनोहर भिडे याच्यावर योग्य ती कारवाई करून त्याला तुरुंगात टाकण्याची मागणी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे निवेदनाद्वारे पदाधिकाऱ्यांनी केली. व घटनेचा निषेध करण्यात येऊन भडगाव तालुका महाराष्ट्र माळी महासंघ व राजकीय पक्षांचे पदाधिकाऱ्यांनी मा. तहसीलदार व मा.पोलीस निरीक्षक भडगाव यांच्याकडे निवेदन देऊन मनोहर भिडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

याप्रसंगी महाराष्ट्र माळी महासंघ जिल्हाध्यक्ष श्याम पाटील, दिनेश पाटील, प्रदीप महाजन, साहेबराव महाजन, विजय महाजन, शिवदास आप्पा महाजन, दीपक माळी, दगडू माळी, भगवान महाजन ,भानुदास महाजन, नितीन माळी, अरुण महाजन, भिकन महाजन, गोकुळ महाजन, दीपक पाटील, जे. के. पाटील, माधव राजपूत, सुरेश परशुराम रोकडे, गणेश महाजन, धोंडू मोरे, वाल्मीक महाजन, शरद महाजन, भूषण महाजन, सुरेश महाजन, मांगो महाजन, भिकन महाजन, चेतन पाटील, दिलीप महाजन, दत्तू माळी, देविदास महाजन, मुकुंदा माळी, रमेश महाजन, धनराज पाटील, अर्जुन माळी, विजय महाजन, राजेंद्र परदेशी, ज्ञानेश्वर महाले, गोरख माळी, संजय माळी, युवराज पाटील, दीपक माळी, अजय विठ्ठल महाजन, संजय महाजन, किरण पाटील-शिंदी इत्यादी. समाज बांधव व महात्मा फुले यांच्यावर प्रेम करणारे सर्व बांधव यांनी उपस्थित राहून तहसीलदार व पोलीस निरीक्षक भडगाव यांना निवेदन सादर करून महात्मा फुले दांपत्याचा अपमान करणाऱ्या विकृत मनोवृत्तीच्या मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे गुरुजी याच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी केली. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा पदाधिकाऱ्यांनी शासनास दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.