एस.टी. चालकास शिवीगाळ करीत मारहाण करणे भोवले; गुन्हा दाखल

0

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

मलकापूर (Malkapur) कडून नरवेल कडे जात असताना एसटी चालकास खाजगी वाहन चालकाने मारहाण केल्याचे घटना काल दि.23 मे रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास चार खांबा चौकात घडली. या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की मलकापूर येथून नरवेल येथे जात असताना चार खांबा चौक येथे एम.एच 19 सी.यु 0898 डस्टर गाडीचा चालक हा समोरून आला व एसटी चालकास म्हणाला की माझ्याकडे डोळे वटावरून का पाहतोय….असे म्हणत शिवीगाळ करत लोटपोट करून चापटा बुक्क्याने मारहाण केली व बस थांबून सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी राजेंद्र कुमार सिंह वसंत सिंह राजपूत वय 43 वर्ष रा. दुधलगांव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डस्टर गाडी चालक आकाश सुरेश खोडके याचेविरुद्ध कलम 353, 323, 504 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल केला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली मलकापूर पोलीस करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.