काठीने मारहाण करत तरुणाची निर्घुण हत्या

अवघ्या तीन तासात आरोपी जेरबंद 

0

मलकापूर, लोकशाही न्युज नेटवर्क 

तालुक्यातील मौजे धरणगाव येथे काठीने जबर मारहाण करून २१ वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली असल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. मृतक हा मोताळा तालुक्यातील डिडोळ्या येथील रहिवासी असून पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. या हत्येचा शोध घेण्यासाठी श्वान पथकाला सुद्धा पाचारण करण्यात आले होते. या घटनेतील एक आरोपी निष्पन्न झाला असून दोन संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी सकाळी ५ ३० वाजेच्या सुमारास तालुक्यातील मौजे धरणगांव येथील काही जण शौचास जात असतांना गावातील खंडोबा मंदिरानजीक असलेल्या सार्वजनिक ओपन सभागृहात त्यांना रक्ताचा सडा आढळून आला. त्यांनी तत्काळ पोलीस पाटलांच्या माध्यमातून शहर पोलिसांना माहिती दिली.

दरम्यान पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांना खंडोबा मंदिरानजीकच्या ओपन सभागृहात रक्ताचा सडा व बाजूला युवकाचा मृतदेह आढळून आला. मृतकाच्या खिशातील मोबाईलवर संपर्क करण्यात आल्याने त्याची ओळख पटली. मृतकाचे नाव दिपक सुधाकर सोनोने वय २१ रा. डिडोळा ता. मोताळा असे आहे.

या घटनेत मृतकावर काठीने जबर मारहाण केल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर खंडोबा मंदिरानजीकच्या ओपन सभागृहात उत्तरेकडून दक्षिणेकडे तब्बल ३० फूट मारेकऱ्यांनी मृतदेह फरफटत नेल्याने रक्ताचा सडा पडल्याचे दिसून आले आहे.

या घटनेत मोताळा तालुक्यातील डिडोळ्याच्या त्या युवकाची हत्या आपल्या गावात कशी. . ? या प्रश्नामुळे धरणगांवात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तीन तासाच्या आत 3 संशयित आरोपी ताब्यात घेऊन त्यातील एक आरोपी अनिल राजाराम इंगळे (वय 45 रा. धरणगाव) याला निष्पन्न केले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता.

बुलढाणा येथील श्वान पथक घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. सदर कारवाई ही बुलढाणा पोलीस अधीक्षक सुनील कडासने व अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात उपविभागीय पोलीस अधिकारी देवराम गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून आरोपी त्यांच्याविरुद्ध कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील प्राथमिक तपास सहाय्यक पोलीस करुणाशील तायडे करीत असून सदर घटना हि रेती वादातून झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.