खुशखबर.. एलपीजी सिलेंडर स्वस्त, पहा नवीन दर

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

वाढत्या महागाईच्या काळात दिलासादायक बातमी आहे. आज 1 जून 2024 पासून देशभरात एलपीजी सिलेंडर स्वस्त झाले आहेत. ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा मोठी कपात केली आहे. IOCL च्या वेबसाइटनुसार 19 किलोग्रॅमच्या एलपीजी सिलेंडरचे दर कमी केले आहे.

आईल कंपन्यांनी हा बदल 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरबाबत केला आहे. 1 जूनपासून दिल्लीत 69.50 रुपये, कोलकातामध्ये 72 रुपये, मुंबईमध्ये 69.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 70.50 रुपये सिलेंडर स्वस्त झाले आहे. सलग तिसऱ्या महिन्यात कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती कमी केल्या आहेत. यापूर्वी, एप्रिल आणि मेच्या सुरुवातीला किंमत कमी केली होती. IOCL च्या वेबसाइटवर नवीन सिलिंडरच्या किंमती अपडेट केल्या गेल्या आहेत.

दिल्लीमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडर आता 1745.50 रुपयांऐवजी आता 1676 रुपयांना मिळणार आहे. कोलकातामध्ये 19 किलोचा एलपीजी सिलिंडर 1859 रुपयांऐवजी 1787 रुपयांना मिळणार आहे. मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 1698.50 रुपयांना विकला जात होता, तो आता 1629 रुपयांवर आला आहे. तर चेन्नईमध्ये 1911 रुपयांना विकल्या जाणाऱ्या सिलेंडरची किंमत 1840.50 रुपयांवर आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.