घर, वाहन आणि दुकानात का बांधतात लिंबू मिरची ?

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

घरांवर किंवा दुकानांवर लिंबू आणि मिरची एकत्र बांधून लटकवल्याचे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. एवढेच नाही तर अनेक लोक आपल्या वाहनातही लिंबू-मिरची लटकवतात. लिंबू आणि मिरची घराच्या दरवाज्यावर किंवा व्यवसायाच्या ठिकाणी लटकवल्यास घर आणि व्यवसायाला वाईट नजर लागत नाही असा अनेकांचा समज आहे. दुसरीकडे अनेक लोक याला अंधश्रद्धा मानतात. घराबाहेर किंवा कार्यालयाबाहेर लटकवले जाणाऱ्या लिंबू आणि मिरचीला वास्तूशास्त्रानुसार विशेष महत्त्व आहे. तसेच यामागे एक वैज्ञांनिक कारण असल्याचा देखील दावा केला जातो.

काय सांगतं वास्तुशास्त्र? वास्तुशास्त्र तज्ज्ञांच्या मते, घरावर किंवा व्यवसायावर एखाद्याची वाईट नजर पडली तर सर्व काही बिघडते. त्यामुळे वाईट नजर टाळण्यासाठी लिंबू आणि मिरची घरांमध्ये आणि दुकानांमध्ये टांगली जाते. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर राहते आणि घर, कुटुंब आणि व्यवसायात प्रगती होते असे मानले जाते. लिंबू-मिरचीमागे काही विज्ञान आहे? काही लोकांच्या मते दारात लिंबू-मिरची लटकवले जाते कारण लिंबाचा आंबटपणा आणि तिखटपणामुळे माश्या, डास आणि इतर अनेक कीटक घरात प्रवेश करत नाहीत.

त्यामुळे आजारी पडण्याची शक्यता कमी होते. लिंबू-मिरचीमध्ये कीटकनाशक गुणधर्म असल्याचे मानले जाते आणि त्यामुळे वातावरण स्वच्छ राहते. असंही मानलं जातं – घराबाहेर लटकलेल्या लिंबू-मिरचीमुळे वाईट नजर टाकणाऱ्याची एकाग्रता लवकर भंग होते, कारण त्याकडे पाहून व्यक्तीच्या मनात त्याच्या चवीची आठवण येते. त्यामुळे समोरच्या व्यक्तीची एकाग्रता भंग होते आणि ते लगेच घरावरून नजर हटवतता.

तुम्ही देखील तुमच्या घर-वाहनाला आणि ऑफिसबाहेर लिंबू-मिर्ची लटवत असाल तर कायम लक्षात ठेवा, नेहमी ताजे लिंबू-मिरची दारावर लटकवणे लाभदायक मानले जाते. करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी – ज्योतिष शास्त्रानुसार जर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यश मिळवायचे असेल तर एक लिंबू कापून त्यामध्ये 4 लवंगा घाला आणि ओम श्री हनुमते नमः मंत्राचा जप करा. या उपायाने करिअरमध्ये यश मिळू शकते. हे थोडे दिवस नाही मिळणार नशीबाची साथ; गुरूचं राशीपरिवर्तन या राशींना वैताग आणणार
याची काळजी घ्यावी – अनेकदा तुम्ही हळदी-कुंकू लावलेला अर्धा लिंबू किंवा लिंबाचे तुकडे रस्त्यावर इकडे तिकडे पडलेले पाहिले असतील. असे तुकडे चुकूनही ओलांडू नयेत, अन्यथा आपल्यावर नकारात्मक शक्तीचा प्रभाव वाढू शकतो, असे मानले जाते.

(टीप : हि माहिती धर्मशास्त्रावर आधारित असून आम्ही याचे कोणत्याही प्रकारचे समर्थन करीत नाही )

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.