लेवा पाटीदार ग्लोबल सोशल फाउंडेशन व LCCIA जळगाव तर्फे “लेवा पाटीदार बिजनेस एक्स्पो” चे आयोजन… गोदावरी फाउंडेशनतर्फे मोफत आरोग्य तपासणी…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

येथील लेवा पाटीदार ग्लोबल सोशल फाउंडेशन व लेवा चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज & ऍग्रीकल्चर (ICCIA) जळगाव यांच्या वतीने शुक्रवार दि. 30/9/22 ते रविवार 2/10/2022 या कालावधीत स्व. बॅरिस्टर निकम चौक, सागर पार्क येथे सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत “लेवा पाटीदार बिजनेस एक्स्पो 2022″ या व्यवसाय प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये ऑटोमोबाइल्स, ट्रॅक्टर्स, मॅन्युफ्रेंक्चरर्स, सोलर, कृषी, बचतगट, पेंट्स, होम डेकोर, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स, होम अप्लायन्सेस, होम ऍप्लिकेबल, एफएमसीजी प्रोडक्ट्स, फूड मॅन्युफॅक्चरिंग, बिल्डर्स, कॉट्रॅक्टर्स, लँड डेव्हलपर्स इत्यादी उत्पादने उद्योग-व्यवसाय व सेवांविषयीचे अनेक खरेदीसुलभ स्टॉल्स राहणार आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या बिजनेस एक्स्पोमध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मुंबई-पुण्याच्या ब्रॅण्ड्रन सोबतच ग्रामीण भागातील उद्योजकांची उत्पादने व कलाकुसरही अनुभवायला मिळणार आहे.

यासोबतच प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागरिकांचा अनुभव अधिक आनंददायी व्हावा यासाठी प्रदर्शनी परिसरातच खवय्यांसाठी खास विविध खाद्यपदार्थांची रेलचेल असलेली ‘खाऊगल्ली असेल, याशिवाय लहान बालकांच्या मनोरंजनासाठी आकर्षक ‘किड्स झोन’ देखील असेल. शिवाय या तीन दिवसात देशभक्तीपर गायन व नृत्य, भारूड, वह्या, ओव्या व अभंग गायन, बहिणाबाईंच्या कवितांवर स्पर्धा, पथनाट्य इत्यादींच्या माध्यमातून खान्देशच्या संस्कृतीचे दर्शनही घडणार आहे. य “लेवा पाटीदार बिजनेस एक्स्पो चे आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य व आकर्षण म्हणजे या प्रदर्शनीत गोदावदी फाउडेशनच्या वतीने प्रदर्शनीला भेट देणाऱ्या इच्छुक नागरिकांनाठी तीनही दिवस मोफत आरोग्य तपासणीची सुविधा देखील करण्यात येणार आहे. या शिबिरात BMI, BP, ECG, BSL, इत्यादींसह 2-डी इको पर्यंतच्या टेस्टही मोफत केल्या जाणार आहेत. म्हणजेच ही प्रदर्शनी म्हणजे खरेदीच्या आनंदसोबतच आरोग्याचा मोफत आढावाही असणार आहे. याचबरोबर प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागरिकांमधून लकी ड्रॉ काढला जाणार असून, महिलांसाठी खास दर तासाला लकी ड्रॉ काढला जाणार आहे. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. जळगावात प्रथमच होत असलेल्या या विविध वैशिष्ट्यपूर्ण. लेवा पाटीदार बिजनेस एक्स्पो’ ला जास्तीत जास्त नागरिकांनी भेट देऊन उद्योजकांना प्रेरणा द्यावी व आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने बोलतांना चंदन कोल्हे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.