बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेतमजुर जखमी

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क 

पाचोरा तालुक्यातील अंबेवडगाव येथूनच जवळ असलेल्या कोकडी तांडा येथील गावातील शेतमजुरी करणाऱ्या दोन मजुरांवर गावा जवळीलच शेत शिवारात बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाल्याची घटना २६ मार्च मंगळवार रोजी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास घडली आहे.

पाचोरा तालुक्यातील अंबेवडगाव पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या कोकडी तांडा येथील गावाजवळील शेत शिवारात मजुरीस गेलेल्या सरदार राजमल चव्हाण (वय ३४) व भिवसन मंगलु चव्हाण (वय ४०) या दोघांवर बिबट्याने अचानक हल्ला चढवत त्यांना गंभीर जखमी केले आहे. दोघ जखमींना ग्रामस्थांच्या मदतीने तात्काळ पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

दरम्यान घटनेची माहिती वन विभागास देण्यात आलेली असून वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. जखमी सरदार चव्हाण व भिवसन चव्हाण यांचेवर खाजगी रुग्णालयात पुढील उपचार सुरू आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.