कोल्हापूरच्या चिमुरडीचा व्हिडीओ झाला व्हायरल, खुद्द अभिनेत्री अमृता खानविलकर न सुद्धा केला शेअर

0

कोल्हापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

अंगात कला असेल तर आपण हवं ते करू शकतो. तसाच काही कोल्हापूरच्या एका चिमुरडीचा व्हिडीओ सध्या शोधलं मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. चंद्रमुखी चित्रपटातील प्रसिद्ध चंद्रा या गीताने अनेकांना वेड लावले. कोल्हापूर जिल्ह्यातील अणुस्कुरा (ता. शाहूवाडी) येथील सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या हर्षदा कांबळे या मुलीने यूट्यूबवर पाहून या गाण्यावर नृत्य केले आहे. हर्षदाच्या ठसकेबाज नृत्याचा व्हिडीओ खुद्द अभिनेत्री अमृता खानविलकर (Amrita Khanwilkar) यांनीही सोशल मीडियात शेअर केला आहे.

निसर्गसंपन्न अणुस्कुरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सहावीच्या वर्गातील हर्षदा कांबळे हिला नृत्याची आवड आहे. तिचे वडील शेती करतात, तर आई आशासेविका आहे. रिकाम्या वेळेत ती मोबाइलमध्ये यूट्यूबवर नृत्याचे व्हिडीओ पाहते. याच आवडीतून तिने स्वत: चंद्रमुखी चित्रपटातील चंद्रा गाण्यावर नृत्य बसवले. आठ मार्चला महिलादिनी शाळेत शिक्षक अनिल कांबळे यांनी हर्षदाच्या नृत्याचा व्हिडीओ चित्रित केला. गेल्या दोन दिवसांपासून हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून, तो सर्वांच्या पसंतीस उतरत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.