‘शहेनशाह’ मधील स्टील आर्म जॅकेट बद्दल “अमिताभ बच्चन” यांनी केला खुलासा

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

शहेनशाह (Shehenshah) या चित्रपटाचे नाव निघाले कि आपल्या डोळ्यांसमोर येतात ते महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि त्यांचं जॅकेट, पण हे जॅकेट नेमकं आहे तरी कुठे ? असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. याचा खुलासा स्वतः बिग बी यांनी केला आहे. १९८८ साली रिलीज झालेल्या या सिनेमाने चाहत्यांना वेड लावलं होतं. आजही या सिनेमातील अमिताभ यांच्या तोंडचे संवाद बिग बींच्या चाहत्यांना अगदी तोंडपाठ आहेत. अमिताभ यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी ‘शहेनशाह’मधील त्या खास जॅकेटचा उल्लेख केला आहे. हे जॅकेट कुणाकडे आहे, हे त्यांनी सांगितलं आहे. तर‘शहेनशाह’मध्ये अमिताभ यांनी घातलेलं ते जॅकेट आता तुर्की अल्लालशिख नावाच्या व्यक्तिकडे आहे. हा तुर्की अल्लालशिख कोण, त्याचा अमिताभ यांचा काय संबंध, असे प्रश्न तुम्हाला पडले असतीलच. तर हा तुर्की अमिताभ यांचा मित्र आहे. सौदी अरेबियाच्या या मित्राला अमिताभ यांनी आपलं स्टील आर्म जॅकेट गिफ्ट म्हणून दिलं आहे.

तुर्की अल्लालशिखने (Turkish Allal Sikh) ट्विटरवर अमिताभ बच्चन यांच्या ‘शहेनशाह’ चित्रपटातील काही छायाचित्रे शेअर करत पोस्ट लिहिली होती, “जगातील सर्वोत्कृष्ट आणि दिग्गज अभिनेत्यांपैक तुम्ही, केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी सन्मान आहात. तुम्ही मला पाठवलेल्या भेटवस्तूबद्दल खूप खूप धन्यवाद. माझ्यासाठी ही भेट खूप अनमोल आहे,” असं त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.