लोहारा येथे इंदोरीकर महाराज यांचे कीर्तन संपन्न

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
लोहारा ता. पाचोरा पाचोरा तालुक्यातील लोहारा येथे यात्रोत्सव समिती व ग्रामस्थ मंडळ लोहारा शहर वृत्तपत्रकार यांच्यातर्फे राष्ट्रीय समाज प्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आलेले होते यांच्या कीर्तनासाठी हजारोंच्या संख्येने महिला पुरुष अशा जनसमुदायाच्या उपस्थितीत समाज प्रबोधनाचे कीर्तन संपन्न झाले।
यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ महाजन ,माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम पाटील ,मधु भाऊ काटे ,जिल्हा दूध संघ संचालक अरविंद देशमुख ,संजय पाटील ,बाबुराव घोंगडे ,डॉक्टर राजेंद्र देशमुख ,नाईक नगर सरपंच जिभाऊ हटकर,म्हसास सरपंच ज्ञानेश्वर पाटील ,लोहारा येथील संघर्षमय परिस्थितीतून शासकीय सेवेत असणारे ईश्वर शिंदे ,लोकसेवा अर्पण करणारे डॉक्टर राजेंद्र देशमुख, सुनील पाटील ,किसन पाटील ,पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर सोनार,मुकेश पाटील, यांची विशेष उपस्थिती होती।
कीर्तनाच्या अगोदर भजन संध्या कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी चंद्रकांत वाडीले ,रजनी भारसके ,गोविंद राजपूत ,भाग्यश्री साठे,अजय पाटील यांनी गायली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पत्रकार दीपक पवार ,चंद्रकांत पाटील ,रमेश शेळके यांनी केले व्यवस्थापक म्हणून भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते शरद सोनार ,विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कैलास चौधरी ,विकास देशमुख, उमेश देशमुख, सुरेश चौधरी, शेनफडु कोळी, व्यवस्थापन पत्रकार कृष्णराव शेळके ,ज्ञानेश्वर राजपूत दिलीप चौधरी यात्रोत्सव समितीचे रमेश शिंदे ,संजय शिंदे ,कैलास खाटीक ,राजेंद्र चौधरी आयोजकांकडून गावातील व परिसरातील अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आलेले होते व्यवस्थापक सूत्रसंचलन आयोजकांकडून त्यांचा सत्कारही करण्यात आला या कार्यक्रमाचे औचित्य साधून लोहारा येथील बांधकाम व्यावसायिक कैलास कुमावत यांचेकडून वृत्तपत्रकार यांना शाल श्रीफळ ,टोपी ,पुष्पगुच्छ अर्थात कलम के बादशहा म्हणून संबोधले जाणारे पत्रकार यांना विशेष असा पेनही सोबत देऊन त्यांनी उपकृत केले या कार्यक्रमात गोंधळ निर्माण होऊ नये म्हणून वाहनांच्या पार्किंगची जबाबदारी गजानन क्षीरसागर यांनी घेतलेली होती अनेक स्वयंसेवकांनी स्वयंस्फूर्तीने अशी मदत येथे केली तर मंत्री महोदय यांना भारत माता प्रतिमा हेमंत गुरव यांच्याकडून देण्यात आली

Leave A Reply

Your email address will not be published.