राज ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका

0

पिंपरी-चिंचवड, लोकशाही न्यूज नेटवर्क

राज ठाकरे यांनी पंतप्रधानांना आरसा दाखवत म्हटले “पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra modi) यांनी देशाकडे लक्ष द्यायला हवे. देशातील प्रत्येक राज्य त्यांच्यासाठी समान असलं पाहिजे. आपण स्वत: गुजराती आहोत. त्यामुळे गुजरातला प्राधान्य देणं हे एका पंतप्रधानाला शोभत नाही”, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. माझी 2014 ची भाषणं काढून बघा. तेव्हा मी म्हटलं होतं की, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यास त्यांनी उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड राज्यांकडे विशेष लक्ष द्यावं, असं राज ठाकरेंनी सांगितलं.

मागच्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि भाजपच्या नेत्यांच्या भेटीगाठी वाढत आहेत. अशात मनसे भाजपच्या युतीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या युतीची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. अशातच राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केलीय. त्यांनी पिंपरी-चिंचवड या ठिकाणी आयोजित केलेल्या जागतिक मराठी संमेलनात (World Marathi Conference) म्हंटले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त एका राज्याकडे पाहु नये, हे मी 2014 ला ही म्हणालो होतो आणि आज ही माझी तीच भूमिका आहे. 2014 नंतर मी ज्या गोष्टी बोललो त्याचं पुढे काय झालं आपण पाहिलं. त्यामुळे 2019 ला लाव रे ते व्हिडिओ कॅम्पेन केलं, असं राज ठाकरे म्हणालेत.

Leave A Reply

Your email address will not be published.